?एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूरचे आवाहन
✒️चंद्रपूर(नरेश निकुरे, कार्य. संपादक)
चंद्रपूर(दि.26 जून)प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर अंतर्गत येत असलेली आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, नागभिड ता. नागभिड जि. चंद्रपूर येथे शासनाकडून 75 विद्यार्थीनीच्या क्षमतेचे वसतीगृह भाडेतत्त्वावर चालविण्याकरिता इच्छूकांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प के.ई.बावनकर यांनी केले आहे.
वसतिगृह भाडेतत्त्वावर चालविण्यास मंजुरी असून शासकीय इमारत उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजूर दरानुसार भाडेतत्वावर इमारत घ्यावयाची असल्याने माहे 1 जुलै 2020 ते 30 जुन 2023 या कालावधीसाठी किंवा 1 जुलै 2020 ते शासकीय इमारत उपलब्ध होईपर्यंत 500 चौ.मी. चे पक्के बांधकाम असलेली चारही बाजुंनी संरक्षण भिंत असलेली 75 व्यक्तींना पुरेशी होईल अशी इमारत भाडेतत्वावर शासनास घेणे आहे. त्याकरीता इमारतीचे कागद पत्रासहीत अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे दिनांक 29 जून 2020 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर यांनी केले आहे.



