Home Breaking News नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन चा वृक्षारोपण उपक्रम–वाढदिवसानिमित्त दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश: विदर्भ अध्यक्ष...

नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन चा वृक्षारोपण उपक्रम–वाढदिवसानिमित्त दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश: विदर्भ अध्यक्ष प्रा.कृणाल मलकापूरे यांचा अभिनव संकल्प

197

✒️यवतमाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 यवतमाळ(दि.19ऑक्टोबर):-नर्सिंग प्रोफेशनसाठी अहोरात्र झटणारे, आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणारे, आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते प्रा .कृणाल मलकापूरे सर 

यांच्या वाढदिवसानिमित्त “प्रयासवन फाउंडेशन, यवतमाळ” येथे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.

“एक व्यक्ती – एक झाड” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापकीय अध्यक्ष श्री मिलिंद दादा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली होती.

“वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पृथ्वीला एक नवा श्वास देणे.” 🌏💚

या कार्यासाठी प्रयासवन फाउंडेशन यवतमाळ यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अकोलकर साहेब, संगमवार साहेब,तसेच इतर सर्व सभासद यांचेनर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले त्यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी प्रा.कृणाल मलकापूरे (प्रवक्ते – नर्सिंग ऑफिसर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य) निखिल गाडेकर सर,रोहित सर, गणेश सर, शंतनु देवकते सर, श्रीकांत चौधरी, हर्ष राऊत सर, साजित शेख, प्रमोद तावडे, ओम टाके, हरी गुडे व ईतर सर्व नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली आहे.