

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१३ऑक्टोबर):-दिनांक 12 ऑक्टोबर ला आपुलकी फाउंडेशन राजुरा संस्थेने स्टरलायझेशन कॅम्प घेऊन अनेक जीवांचे सार्थक केले आहे. या कॅम्पमध्ये साधारण १५ श्वानाचे स्टरलायझेशन झाले त्यामध्ये दोन मेल तर तेरा फिमेल असे श्वान होते .प्रत्येक फीमेल डॉग ला दर सहा महिन्यांनी पिल्लू होतात व त्यांच्या संख्येत वाढ होते त्यातले बोटावर मोजण्या इतक्या पिल्लांना अन्न वस्त्र निवारा लाभतो बाकीच्या पिल्लांचे वाताहात होते काही पिल्लं अपघातात मरण पावतात तर काही सीडी गॅस्ट्रो सारख्या भयानक आजार ने आणि मरण पावतात .बऱ्याच श्वानाना दोन वेळ पोटभर जेवण न मिळाल्याने काही ॲग्रेसिव्ह होतात जर ह्या श्वानाचे दर सहा महिन्यांनी स्टरलायझेशन कॅम्प घेतल्यास त्यांची संख्या आपोआप कमी होईल लोकांना त्यांचा त्रासही होणार नाही व त्यांची वाहतात थांबेल ही गोष्ट लक्षात घेऊन आपुलकी फाउंडेशन राजुरा पिल्लूंच्या स्टरलायझेशन कॅम्प साठी पुढे आले व त्यांनी हा कॅम्प स्वखर्चाने घेतला या कॅम्पमध्ये प्राणी प्रेमींनी त्यांच्या भागात राहणारे रस्त्यावरील श्वानना शस्त्रक्रियेकरिता आणले होते .
हा कॅम्प लोकवर्गणीतून आयोजित केला होता यामध्ये सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता ज्या ज्या दात्यांनी ह्या कॅमसाठी वर्गणी दिली त्यांचे आपुलकी फाउंडेशन तर्फे मनःपूर्वक आभार या कॅम्पमध्ये ऑपरेशन साठी डॉ. एस. व्हि. ढालकरी तसेच डॉ. हर्षल मुंडेकर यांचे सहकार्य लाभले तर अभय यादव , सुरक्षा गोरंतवार , श्रेया पळसपगार , प्रतीक कावळे , अर्चना कुत्तरमारे , रेणुका सावरकर , भुमेश उरकुडे , गणपत सोयाम ह्या प्राणी प्रेमींनी श्वान आणले होते तर या कॅम्पचे आयोजन या फाउंडेशनच्या अध्यक्ष कृतिका सोनटक्के , रश्मी साहू , भावना रागीट, रमा आइटलावार , प्रतीक कावळे यांनी केले एक चांगला उपक्रम आपुलकी फाउंडेशन ने राबवला.
या आधी त्यांनी एक जून २०२५ ला १५ डॉगचे स्टरलायझेशन कॅम्प घेतला होता हा पण कॅम्प त्याने स्वखर्चानेच घेतला होता पुढे अजून चार महिन्याने मोठ्या प्रमाणात या कॅम्पच्या आयोजन करण्याचा आपुलकी फाउंडेशनचा मानस आहे.







