Home महाराष्ट्र सुनील देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केलेला आरोप निघाला खोटा-न. प. राजुरा मुख्याधिकारी...

सुनील देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केलेला आरोप निघाला खोटा-न. प. राजुरा मुख्याधिकारी यांनी केला प्रसिद्धी पत्रकातून खुलासा

199

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.१३ऑक्टोबर):- राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देश व मार्गदर्शक सूचनेनुसार राजुरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मतदार यादी तयार करण्यासाठी आयोगाने निश्चित केलेल्या तारखेस १ जुलै २०२५ रोजी अद्यावत असलेली विधानसभा निवडणूक यादी मुख्य संदर्भ यादी असून सदर यादीतील एकूण मतदारांचे प्रभाग निहाय विभाजन करणे करिता निर्देश होते. उपरोक्त संदर्भ यादीचे शहरातील एकूण दहा प्रभागात विभाजन केल्यानंतर प्रभाग नियाय प्रारूप यादी दिनांक ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट होणे किंवा कोणत्याही प्रभागात नाव नसणे याबाबत आक्षेप घेण्याकरिता १३ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

सदर यादीचे मतदार निहाय विभाजन करताना काही मतदारांचा समावेश चुकीच्या प्रभागात झाल्याचे निदर्शनास आले तसेच काही मतदार ज्यांचा नावाचा समावेश विधानसभा मतदार यादीत होता परंतु नगरपरिषद निवडणूक प्रारूप मतदार यादीत कोणत्याही प्रभागात नाही. योग्य प्रभागात नाव समावेश करून मिळणे किंवा कोणत्याही प्रभागात नाव नसणे परंतु योग्य प्रभागात नाव समावेश करून मिळणे याकरिता विविध मतदारांनी आक्षेप अर्ज नगरपरिषद राजुरा येथे दाखल केले. या आक्षेप अर्जावर सक्षम प्राधिकरणाने निकाली काढल्यानंतर अंतिम मतदार यादी आता दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. 

            सुनील देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट नाही . परंतु प्रभाग क्रमांक ३ च्या प्रारूप यादीचे निरीक्षण केले असता सुनील देशपांडे यांचे नाव १६२१ या अनुक्रमांकवर समाविष्ट आहे. त्यांचे निवासस्थान व प्रभाग क्रमांक तंतोतंत जुडल्याचे आढळले आहे. असे असले तरी सुनील देशपांडे यांना कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यावयाचा असल्यास विहित मुदतीत आक्षेप घेण्यास पूर्ण संधी उपलब्ध आहे असे प्रसिद्धी पत्रकामध्ये मुख्याधिकारी यांनी नमूद केले आहे.–विवेक चौधरी, मुख्याधिकारी, नगर परिषद राजुरा