Home चंद्रपूर पहिले स्त्रीवादी साहित्य संमेलन 26 ऑक्टोंबरला कोल्हापुरात-रंजनाताई सानप संमेलनाध्यक्षा तर उद्घाटक स्मिताताई...

पहिले स्त्रीवादी साहित्य संमेलन 26 ऑक्टोंबरला कोल्हापुरात-रंजनाताई सानप संमेलनाध्यक्षा तर उद्घाटक स्मिताताई पानस

351

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.24ऑक्टोबर):-आम्ही भारतीय महिला मंच, आयोजित फक्त महिलांनी, महिलांसाठी आयोजित केलेले पहिले राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलन रविवार, दि. 26 ऑक्टोंबर, 2025 रोजी सकाळी 10:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार असून या स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी मायणी, साताराच्या सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका रंजनाताई सानप, उद्घाटक अहिल्यानगरच्या ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिताताई पानसरे, स्वागताध्यक्ष सांगलीच्या सुमनताई पुजारी, प्रमुख पाहुण्या भारतीताई पवार, सरलाताई पाटील, षण्मुखा अर्दाळकर, डॉ. शोभा चाळके, सीमा पाटील, डॉ. स्वाती नांगरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी दिली.

दिवसभर चालणाऱ्या संमेलनात उद्घाटन सत्र, लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार वितरण आणि कवी संमेलन असा संयुक्त कार्यक्रम होणार असून कणकवलीच्या कवयित्री प्रा. सुचिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनात नसीम जमादार, नंदिनीताई पाटील, अपूर्वा पाटील, सरस्वती डवरी, वसुंधरा निकम, मुग्धा टेंगशे, पूर्णिमा देसाई, शशिकला सरगर, अश्विनी टाकळे, रोहिणी पराडकर, स्नेहलता कुरणे, दिप्ती कुलकर्णी, उज्वला जाधव, सुरेखा खेडेकर, त्रिशला शहा, सुनिता पेडणेकर, दया पाटील, वैशाली कांबळे, आशा धनाले, सुवर्णा पवार, डॉ. रजनी रणपिसे, उर्मिला शहा, शितल साळगावकर, प्रा. विभा शहा, वनिता पाटील, वनिता भोरे, उर्मिला आसगेकर, प्रांजली चौधरी, वर्षा शिंत्रे, वसुमती मोकाशी, अनुराधा कुलकर्णी, निशा शिंदे आदी राज्यभरातून येणाऱ्या कवयित्री आपल्या कविता सादर करणार आहेत.

बिना माने, डॉ. श्रद्धा कोठावळे, सानिका तुळसकर, सुलोचना बागडी, सरिता पाटील, विद्या नाळे, डॉ. विद्या राईकवार, प्रतिभा भंडारे, अनिता कांबळे, शारदा काटू, कमल वावरे, श्वेता काणेकर, माधुरी सावंत-भोसले, भारती कांबळे, डॉ. माया तिरमारे, रोशनी गंभीर, अर्चना कुलकर्णी, पूर्णिमा देसाई, डॉ. सोनाली इंगळे, प्रीती कांबळे, ॲड. संध्या देशपांडे, डॉ. अश्विनी बदादे, ॲड. डॉ. प्रियंका खंडाळे, नीना जोशी, अर्चना घाडगे, शशिकला घाडगे, गीता लळीत, जया जोशी, सुरेखा भिंगले-डवर, सुनिता वाजंत्री, देवीना माने, गीता पोवार, प्रियाली शिंदे, हिराताई देशमुख, वंदना साळुंखे, प्रा. डॉ. वैशाली गुंजेकर आदी महिलांना यावर्षीचा लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विमल पोखर्णीकर, अनिता गायकवाड, वृषाली कवठेकर, नीती उराडे, राजश्री मधाळे, अनिता बावडेकर, ॲड. तमन्ना मुल्ला, आशा केसरकर, प्रीती पवार, मंगल समुद्रे, शकुंतला सावंत, विजया कांबळे, उषा कोल्हे, पदमा माळवी, कमल कवठेकर, वंदना धनवडे, मंदाकिनी तरटे यांनी संमेलनाचे आयोजन केले असून सदर साहित्य संमेलनाला समतावादी स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला अनिता काळे, अनिता गायकवाड, विमल पोखर्णीकर, वृषाली कवठेकर, सुलभा भणगे, विजया कांबळे, स्नेहा हुलस्वार, राजश्री मधाळे, अनिता बावडेकर, शकुंतला सावंत, अंतिमा कोल्हापूरकर, जयश्री पोळ आदी उपस्थित होत्या.