Home महाराष्ट्र दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजन 

दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजन 

150

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-70663 70489

भंडारा(दि.24ऑक्टोबर):-लाखनी येथील उत्सव सेलिब्रेशन हॉल अँड लान येथे येथे दिनांक 15 आणि 16 नोव्हेंबर 2025 रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय पहिले ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या अनुदानातून मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था दिघोरी /नान्होरी जि. भंडारा द्वारा आयोजित या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध रंगकर्मी आणि समीक्षक प्रा. डॉ. संजयकुमार निंबेकर तर उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, नागपूर, विशेष अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी, निर्माता, दिग्दर्शक जयू भाटकर, मुंबई , प्रसिद्ध साहित्यिक लखनसिंह कटरे, डॉ. प्रमोद मुनघाटे, वसंत वाहोकार, अतिथी म्हणून डॉ. सोमदत्त करंजेकर, डॉ.सोपानदेव पिसे, डॉ. श्रीकांत भोवते,खूमेंद्र बोपचे, कवी प्रमोदकुमार अणेराव, रोशन जांभुळकर, सभापती अश्विनी मोहतुरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीषा निंबार्ते, डॉ. स्वाती वाघाये, नगराध्यक्षा त्रिवेणी पोहरकर , सरपंच शेषराव वंजारी,सचिन बागडे हे प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी काही लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

‘अभिजात मराठी भाषेत ग्रामीण साहित्याचे वेगळेपण’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. राजकुमार मुसने तर वक्ते म्हणून डॉ. के. एल. देशपांडे, डॉ.नीलिमा कापसे, डॉ.अरविंद कटरे, डॉ.धनराज खानोरकर, डॉ.जगजीवन कोटांगले हे उपस्थित राहणार आहेत. दु. 2-30 वा.अरुण बनसोड आणि त्यांचा संच ‘खडीगंमत ‘हा कार्यक्रम सादर करतील. 3-15 वा.झाडीप्रवर्तक तथा बोलीतज्ज्ञ डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे.डॉ.मुक्ता आगाशे आणि कुंजीराम गोंधोळे ही मुलाखत घेतील.

सायं.4-15 वा. अनिल शेंडे आणि पालिकचंद बिसेन यांच्या बासरी वादनाची जुगलबंदी रसिकांना ऐकता येईल. सायं. 5-00 वा.झाडीपट्टीतील युवा कलावंतांचा पंचरंगी लोककलाविष्कार ‘झाडीपट्टीचा धुमधडाका ‘ हा कार्यक्रम सादर होणार आहे. रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी स. 10-00 वा. सुप्रसिद्ध गझलकार प्रल्हाद सोनवाने यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. प्रा.युवराज गंगाराम, गजेंद्र गजभिये,हरिभाऊ मोहतुरे, माणिक गेडाम,सुरेश वंजारी,बापू इलमकर हे प्रमुख अतिथी राहतील. यात निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करतील. दु. 12-00 वा. ‘मराठीतील विविध साहित्य प्रवाह’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. रेणुकादास उबाळे तर वक्ते म्हणून डॉ.बंडू चौधरी प्रा.प्रवीण कांबळे,प्रा. नरेश आंबिलकर,डॉ.जयश्री सातोकर हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2-30 वा. महेंद्र गोंडाने यांचा’ सहावी बाळंतीण’ हा धमाल विनोदी एकपात्री प्रयोग होणार आहे.

दुपारी 3-15 वा. ‘नैराश्यमय युवा पिढीतील व्यसनाधीनता: एक प्रश्न,अनेक उत्तरे ‘ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष जयू भाटकर, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन हे राहतील तर वक्ते म्हणून प्रा. दिनेश कोटांगले, डॉ. शरद मेश्राम, जितेंद्र असोले,निखिल बनसोड, अवंती सिंगनजुडे हे आपले विचार व्यक्त करतील. त्यानंतर 4-15 वा. भंडारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार समारोह आणि समारोपीय कार्यक्रम होणार आहे,त्यात डॉ.संजयकुमार निंबेकर अध्यक्षस्थानी तर अतिथी म्हणून जयू भाटकर, डॉ. प्रमोद मुनघाटे,भगवान सुखदेवे,डॉ. धनंजय भिमटे, सुभाष बावनकुळे, जि. प. सदस्य विद्याताई कुंभरे,सुर्मीला पटले, गणेश निरगुडे, माजी सभापती अशोकभाऊ चोले,माजी जि. प. सदस्य आकाश कोरे,मुख्य न्यायरक्षक ऍड.भारत गभणे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

तर डॉ. हेमकृष्ण कापगते, सी.एम. बागडे,हर्षल मेश्राम, अमृत बनसोड,डोमाजी कापगते या भंडारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार होणार आहे. दोन दिवसीय साहित्य संमेलनातील उदघाटकीय आणि समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य संयोजक तथा मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सुरेश खोब्रागडे, विना डोंगरवार, निमंत्रक डॉ. युवराज खोब्रागडे हे करतील. मुख्य संयोजक डॉ. सुरेश खोब्रागडे, निमंत्रक डॉ. युवराज खोब्रागडे, स्वागताध्यक्ष संजय वनवे, आयोजन समिती अध्यक्ष रामेश्वर बिसेन, सचिव डॉ. 

रेवाराम खोब्रागडे , सुरेंद्र बन्सोड, नामदेव कानेकर, रंजित वासनिक, अश्विनी भिवगडे,गोपाल नाकाडे, आशाताई वनवे, सुमनताई कानेकर, वैशाली निंबेकर, बाबुराव निखाडे, भास्कर पिंपळे, प्रमोद लांडगे, रवी खोब्रागडे, रवी रामटेके, देवराम शेंडे, डॉ. युवराज मोटघरे, प्रा. उमेश सिंगनजुडे, आकाश भैसारे आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.