Home महाराष्ट्र जळगाव जिल्हा व नंदुरबार जिल्हा नूतन कार्यकारिणी ऑनलाईन बैठकीत घोषित …

जळगाव जिल्हा व नंदुरबार जिल्हा नूतन कार्यकारिणी ऑनलाईन बैठकीत घोषित …

137

▪️अखिल भारतीय ग्राहक पंचायत धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन तर सचिवपदी शांतीलाल बडगुजर यांची एकमताने निवड

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.19ऑक्टोबर):- काल वसुबारस या दिवशी जळगाव जिल्हा व नंदुरबार जिल्ह्यांची जॉइनट ऑनलाईन बैठक प्रांत अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब औटी यांचे अध्यक्षते खाली प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी आयोजित केलेली बैठक संपन्न झाली.

          बैठकीस जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील मान्यवर सदस्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.बैठकीस प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांत उपाध्यक्षा व नंदुरबार जिल्हाध्यक्ष सौ.ताईसाहेब वंदना तोरवणे , प्रांत सचिव व जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख,जळगाव जिल्हा पालक आदरणीय श्री काकासाहेब विलासजी लेले , प्रांत कोषाध्यक्ष श्री विलास जगदाळे ,प्रांत कार्यकारिणी सदस्या अँड .ताईसाहेब भारती अग्रवाल यांची तसेच जळगाव जिल्हा संघटक अँड.सुभाष तायडे , जिल्हा सचिव श्री जगन्नाथ तळेले जिल्हा सह संघटक श्री भाईसाहेब मकसूद बोहरी ,जिल्हा सह कोषाध्यक्ष सौ.ताईसाहेब कपिला मुठे आदी जिल्हा सदस्य पदाधिकारी व जळगाव जिल्ह्यातील तालुका मान्यवर सदस्य पदाधिकारी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील संघटक प्रा. डी. सी.पाटील , श्री रणजीत सिंग राजपूत पाटील आदी मान्यवर सदस्य चे उपस्थित प्रांत अध्यक्ष बाळासाहेबजी औटी यांनी जळगाव व नंदुरबार जिल्ह्याच्या प्रस्तावित कार्यकारिणीस मान्यता देत जळगाव जिल्हाध्यक्ष पदी अँड.सुभाष तायडे , उपाध्यक्ष पदी श्री सतीश देशमुख व दिनेश तायडे यांची तर सचिव पदी श्री रमेश सोनवणे यांची तसेच नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी प्रा. डी. सी.पाटील ,उपाध्यक्ष पदी श्री मधुकर देसले ,श्री येवले व जिल्हा सचिव म्हणून श्री रणजीत राजपूत पाटील यांची व दोन्ही जिल्ह्यातील इतर जिल्हा पदाधिकारी यांची नियुक्ती जाहीर केली. तसेच प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी उपस्थितांशी संवाद साधत संघटनेचा समर्पित कार्यकर्ता व कार्याची स्पष्टता करीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील नुकताच संपन्न झालेल्या परिचय मेळावा चा संदर्भ देत जिल्हा व तालुका अभ्यास वर्ग व त्रिमासिक कार्य आराखडा तयार करून कामास लागावे व श्रीक्षेत्र ओझर येथील अभ्यास वर्गास दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

       बैठकीचे सुरुवातीस डॉ अनिल देशमुख यांनी ग्राहक तीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी उर्फ नाना स्मृती वंदना देत सर्व उपस्थितांचे शब्द सुमनानी स्वागत केले व सौ.ताईसाहेब गंगा अग्रवाल यांनी सुश्राव्य स्वागत गीत सादर केले. त्यानंतर डॉ.अनिल देशमुख यांनी सुचविल्या प्रमाणे अँड .भारती अग्रवाल यांनी ग्राहक संघटन मंत्राने ऑनलाइन बैठकीस सुरुवात करण्यात आली. 

        आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांनी जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे मजबूत व विस्तारित संघटनात्मक कार्याचा अहवाल व परिवहन, विज वितरण ,सायबर क्राइम ,बोगस बियाणे , वस्तू खरेदी ,ऑनलाईन पर्चिसिंग ,बँक व पतसंथ मधील अवास्तव व्याज आकारणीत झालेली ग्राहकांची फसवणूक आदी विभागात ग्राहकांना न्याय मिळून देण्यात नोंद घेता येईल अशा 53 केसेस मध्ये ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाले बद्दल तसेच जिह्यात इतर ग्राहक संघटनेच्या स्पर्धेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यावर 50 टक्के आपले प्रतिनिधी ची अभिमानास्पद नेमणूक करून घेण्यात यशस्वी झाले बद्दल समाधान व्यक्त केले.

           तसेच नवनियुक्त जळगाव जिल्हाध्यक्ष अँड.सुभाष तायडे यांनी आगामी काळात डॉ.अनिल देशमुख यांनी संघटनेचा प्रगती आलेख उंचावत ठेवण्याचे केलेले बहुमोल कार्य व भक्कम पाया अबाधित ठेवित व भविष्य कार्य प्लॅन सादर केला .नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डी.सी.पाटील यांनी उपस्थितांचे व जिल्हाध्यक्ष सौ.वंदना तोरवणे यांचे बद्दल ऋण व्यक्त करीत मनोगत व्यक्त केले. 

        बैठकीत एरंडोल तालुका अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री मुल्लाजी नूरुद्दीन ,उपाध्यक्ष अँड.विलास मोरे व सचिव श्री रवींद्र जोगी यांची तर अमळनेर येथील तालुकाध्यक्ष सौ.ताईसाहेब स्मिता चंद्रात्रे ,उपाध्यक्षा सौ.ताईसाहेब ज्योती भावसार , सचिव श्री सुनील जी वाघ यांची तर पाचोरा तालुका अध्यक्ष संजय पाटील ,उपाध्यक्ष अँड.सचिन देशपांडे व सचिव पदी अँड.निलेश सूर्यवंशी यांची तर भडगांव तालुका अध्यक्ष पदी प्रा. सुरेश कोळी ,उपाध्यक्ष निलेश बडगुजर व सचिव पदी आकाश दिनेश पाटील व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुरेश रोकडे आदर्श शिक्षक यांची तसेच *धरणगाव येथील विनायक महाजन यांची तालुका अध्यक्ष म्हणून तर शांतीलाल बडगुजर यांची सचिव पदी निवड जाहीर करण्यात आली* उर्वरित तालुक्यांची कार्यकारिणी पुनर्रचना लवकरच करण्यात येईल असे नूतन जिल्हाध्यक्ष ॲड.सुभाष तायडे यांनी जाहीर केले.

        जळगाव जिल्हा सहसचिव व ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री भाई साहेब मकसूद बोहरी सुंदर शब्दांकन करीत बैठकीस उपस्थितांचे व उत्तम व्यवस्थापन अँड.निलेश सूर्यवंशी यांनी केल्या बद्दल त्यांचेही आभार मानलेत.सौ .ताईसाहेब कपिला मुठे यांनी सुश्राव्य मनाला शांति देणारा शांति मंत्राने बैठकीची सांगता झाली. अँड.भारती अग्रवाल प्रांत कार्यकारिणी सदस्य यांनी सूत्र संचालन केलेत .