Home महाराष्ट्र डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे द्या

डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे द्या

96

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️महिला अधिकार परिषदेची निवेदनातून मागणी

म्हसवड(दि.28ऑक्टोबर):-फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याची आणि ही केस जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी महिला अधिकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भातील निवेदन माण तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले.

 निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, डॉ. संपदा मुंडे यांनी केलेल्या तक्रारींवर पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने योग्यवेळी दखल घेतली असती, तर हा दुर्दैवी प्रकार घडला नसता. “जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जर भक्षक बनत असतील, डॉक्टरांच्या कामात लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत असतील, तसेच आयटी इंजिनिअर असणारा तरूण शारीरिक व मानसिक छळ करत असेल तर प्रशासन व कायदा कुठे आहे?” असा गंभीर सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

“लोकशाही नावापुरती राहिली असून समाजात विकृती वाढत चालली आहे. शिव-शाहू, फुले-आंबेडकरांच्या विचारांनी घडलेल्या महाराष्ट्राला हा कलंक आहे.” असे मतदेखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, प्रशांत बनकर तसेच इतर सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

या निवेदन सादरीकरणावेळी महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्षा भारती पवार,माधुरी सुतार, सुवर्णा दीक्षित, सोनाली सुतार, जयश्री बारशिंगे, संगीता सुतार, वंदना कुंभार, अंजली चव्हाण, मंगल अवघडे, राणी अवघडे, वंदना अवघडे, अनिता मदने, अनिता जाधव, कल्पना खरात, ऊज्वला नवले, छाया खरात, मेघा डोंबे, रेश्मा सरतापे, वर्षा जगदाळे यांच्यासह परिषदेच्या कार्यकर्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.