Home Breaking News देवापूरकरांचा नागरी सत्कार ऊर्जा देणारा: ॲड. विरल संभाजी बाबर

देवापूरकरांचा नागरी सत्कार ऊर्जा देणारा: ॲड. विरल संभाजी बाबर

128

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.28ऑक्टोबर):-देवापूर वासियानी केलेला नागरी सत्कार हा ऊर्जा देणारा असून वकिली क्षेत्रात कार्यरत असताना कुटुंबासहित गावाने दाखवलेला स्नेह लोकसेवेसाठी बळ देणारा असल्याचे मत देवापूर चे सुपुत्र व जगभरात बहु चर्चित राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील कर्नल पुरोहित यांचे वकील ॲड. विरल संभाजी बाबर यांनी व्यक्त केले. ते देवापूर येथील नागरी सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी उपस्थित देवापूर चे सरपंच तात्यासाहेब औताडे, मा.सरपंच शहाजी बाबर , जिल्हा उप निबंधक नानासाहेब चव्हाण, ॲड. संभाजी बाबर, ॲड .विद्या संभाजी बाबर प्रा.विश्वंभर बाबर,ॲड. आनंदा पोळ , डॉ . विकास बाबर, डॉ.मनिषा बाबर,हायकोर्ट मुंबई च्या सरकारी वकील ॲड मीनाक्षी आनंदा पोळ ,ॲड. विवेक संभाजी बाबर ,डॉ.रेश्मा कुंडले राज भोई,डॉ.सयाजीराव पवार, डॉ.विकास बाबर,साहेबराव पोळ यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांशी संवाद साधताना ॲड. विरल बाबर म्हणाले की ही माती कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती असून या मातीने देशासाठी अनेक उच्च शिक्षित अधिकारी, उद्योजक घडवले.गावाचे योगदान वकिलीच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचे असते .कारण ग्रामीण भागातूनच खऱ्या अर्थाने स्थानिक लोकांच्या समस्या आणि गरजांबद्दल मौल्यवान माहिती मिळत असते.यामुळे वकील म्हणून मला अधिक समर्पक आणि प्रभावीपणे कायदेशीर कार्य करता आले.म्हणूनच या मातीचा मी कायमस्वरूपी ऋणी असेल.. देवापूरसह पंचक्रोशीला टाटा ट्रस्ट ने ग्रामीण विकासाच्या बाबतीत मोलाचे सहकार्य केल्यानेच ही पंचक्रोशी सर्वांगीण विकासात कायम अग्रेसर राहिली आहे.५०व्या वर्षपूर्तीनिमित्त टाटा ट्रस्ट ने “स्पंदने एका न्यासाची” हे पुस्तक प्रकाशित केले होते. यामध्ये ग्रामीण विकासावर माण तालुका विशेषत देवापूर वर प्रकाशझोत टाकला आहे. कर्मवीरांच्या कार्यकाळात या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी साधी विहिरही न्हवती. टाटांच्या योगदानामुळे या भागातील परिस्थिती बदलली आहे. सद्यस्थितीत इथले उच्च शिक्षित तरुण ही शेतीकडे वळवलेले दिसतात.याचा सार्थ अभिमान वाटतो.

अशा परिस्थितीत इथली परिस्थिती ओळखून त्या काळी कर्मवीरांनी माजी रेल्वे मंत्री व माजी वित्त मंत्री डॉ. जॉन मॅथ्यू यांना याच भूमीत आणत स्व. सदाशिव आण्णा व ग्रामस्थांना या गावासाठी काय मदत हवी? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी सर्वांनी या एकट्या देवापूर चे नाव न सुचवता संपूर्ण पंचक्रोशीसाठी टाटा चे योगदान हवे असे सांगितले होते. इतक्या निस्वार्थी भूमीचा सुपुत्र म्हणून वकिली क्षेत्रात कार्यरत असल्याचा अभिमान आहे.. म्हणूनच इथल्या युवा पिढीने स्वतःला सिद्ध करता येईल अशा क्षेत्रात जाऊन देश विकासासाठी योगदान द्यावे असे मत त्यांनी उपस्थितांशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी वर्षभरात विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या युवक युवतींचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.