

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.12नोव्हेंबर):-पंचायत समिती केंद्र सावरगाव बंगला अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मांडवा येथे माजी विद्यार्थ्यांची नुकतीच सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख मनोज रामधनी हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष धम्मदीप ढोले, सदस्य प्रमोद पुलाते, शिक्षण प्रेमी विठ्ठल राठोड हे उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांना सभेसाठी सूचना देऊन उपस्थित राहणेबाबत कळविल्यानुसार सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी मुख्याध्यापक कैलास भरगाडे यांनी शासनाच्या दि.1 ऑक्टोबर 25 च्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबतच्या निर्णयाच्या विषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून केंद्रप्रमुख मनोज रामधनी यांनी सांगितले की माझे गाव माझी शाळा हा उपक्रम समजून मला काहीतरी गावासाठी व शाळेसाठी देण लागते. या भावनेतून सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा भौतिक विकास करण्यासाठी सहकार्य करावे. नरेश नालमवार यांनी आभार व्यक्त केले.
सभेला गावातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







