Home चिमूर ग्रामगीता महाविद्यालयात ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

ग्रामगीता महाविद्यालयात ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

124

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

   चिमूर(दि.12नोव्हेंबर):-ग्रामगीता महाविद्यालयामध्ये एक दिवसीय ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 12 नोव्हेंबर 2025 ला प्राणीशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन ची प्रात्यक्षिक तसेच शेतीमधील पूरक व्यवसाय व त्यासंबंधी रोजगार याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख प्रशिक्षक म्हणून श्री. सुमित मुंगले, सलाम किसान,मुख्य व्यवस्थापक व श्री रितेश पिसे हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. सुनंदा आस्वले, यांनी या उपक्रमाचा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणे तसेच त्याचा प्रभावी वापर कसा करता येईल याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. निलेश ठवकर व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. मृणाल वराडे हे मंचावर उपस्थित होते. ‘सलाम किसान’ संस्थेचे मुख्य व्यवस्थापक, श्री सुमित मुंगले व प्रशिक्षक, श्री रितेश पिसे यांनी ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना करून दाखविले.

त्याचप्रमाणे सलाम किसान द्वारे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन डॉ. बिजन कुमार शील, प्रास्ताविक डॉ. निलेश ठवकर व आभार प्रदर्शन, डॉ. मृणाल वराडे व कार्यक्रमाचे आयोजन, डॉ.सुमेध वावरे यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेकरिता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.