Home महाराष्ट्र भयभीत माणूस लढत नाही

भयभीत माणूस लढत नाही

150

मी खूप धाडसाने काम करतो.बोलतो.माझे कौतुक पण होते.पण लोक सोबत येत नाहीत.म्हणतात, तुमच्या सोबत आल्याने नुकसान होऊ शकते.समोरचे चोर त्रास देतील.अडवणुक करतील.माझा दवाखाना आहे.माझे दुकान आहे.माझी बायको नोकरी करते.माझी मुलगी कॉलेज मधे जाते.माझा मुलगा शाळेत जातो.आई वडिल म्हातारे आहेत.असे सांगणारी,समजणारी माणसे फक्त खाणे,हागणे आणि पोरं देणे यालाच जिवन समजतात.आहार,निद्रा,भय आणि मैथून.यालाच जिवन समजतात.भारतीय तत्वज्ञानात यावा पशू असे म्हणतात.अशी माणसे जी आधीच भयभीत आहेत ते निर्भयपणे कसे लढतील?

   भारतीय सैनिक सिमेवर असा विचार करू लागले तर काय होईल? मी जर गोळी मारली तर ते समोरचे सैनिक पण मला गोळी मारतील.मला मारून टाकतील.अशी भीती वाटली तर तो लढणे शक्य नाही.

      असाच प्रकार राजकारणात असतो.मुळातच आपण चुकीची कामे करू नये.चोरी चपाटी करू नये.तर कोणाची काहीच मजाल नाही कि अडवणूक करू शकतो.

    मला जळगाव शहरातील, जिल्ह्यातील डॉक्टर, वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक ओळखतात.कौतुक करतात.पण त्यांची गोदळी चोरांच्या पायाखाली अडकवलेली असते.असे त्यांना वाटते.किंवा काही सरकारी दान, अनुदान,लाभ,लोभ मला मिळणार नाही.असा त्यांचा समज असतो.मी चुकीचे काम केले अथवा न केले तरीही मला त्रास देतील.माझ्या बायकोला,पोरांना त्रास देतील.अशी खोटी भीती वाटते.

   जर अशीच भीती छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक,महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल,नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना वाटली असती तर ते पण मैदानात उतरले नसते.त्यांनी पण वकालत चालवली असती.दवाखाना किंवा किराणा दुकान चालवले असते.एखादज दारूचे दुकान किंवा रेतीचा ठेका घेतला असता.इतका त्याग केल्यावर भारत स्वतंत्र झाल्यानंतर या स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्यांच्या मुलांना देऊन टाकला का कोणी?

     माणूस कोणाची परवानगी घेऊन, मेहरबानी म्हणून जन्माला येत नाही.कोणीच असा आला नाही.कोणीच विचारले नाही.कि,मला कोणी त्रास देत नसाल तर मी जन्म घेतो.नाहीतर येथेच राहातो,आईच्या पोटात.येथे काहीच भीती वाटत नाही.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२