

▪️३ व ४ जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला सत्यशोधक समाज संघाचे राज्य अधिवेशन !…
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.31डिसेंबर):- शहरातील संजय नगर येथील मारुती मंदिरामध्ये सत्यशोधक समाज संघाची सभा संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक एच डी माळी यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य भिका महाजन होते. रामू दादा जाधव, शांताराम महाजन, रावण महाजन, एकनाथ महाजन, कृपाराम महाजन, विजय महाजन, तुळशीराम महाजन, देवराम महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते संत सावता महाराज, महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नवनियुक्त नगरसेवक हेमंत महाजन यांचे सत्यशोधक दिनदर्शिका देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अधिवेशनबाबत विस्तृत माहिती दिली. आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक विचारांवर चालूया. अंधश्रद्धा, कर्मकांडाला दुर सारू या व आपल्या परिसरात सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, दशपिंड विधी, साक्षगंध सोहळा करूया. यानंतर सत्यशोधक दिनदर्शिका संदर्भात विस्तृत माहिती दिली आणि अधिवेशनासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
समाजातील ज्येष्ठ सदस्य यांनी छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी संजयनगर परिसरातून जास्तीत जास्त कार्यकर्ते येतील आणि सर्वोतपरी सहयोग करू. यांसह जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी अधिवेशनाला येण्याचे आवाहन देखील केले. याप्रसंगी हेमंत महाजन व बापू महाजन यांनी १०० दिनदर्शिका घेतल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी तर आभार बापु महाजन यांनी मानले.







