Home चिमूर विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीचे कास धरून प्रगती करावी-प्रज्ञा राजूरवाडे

विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीचे कास धरून प्रगती करावी-प्रज्ञा राजूरवाडे

115

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.17डिसेंबर):-पंचशील शिक्षण मंडळ चिमूर अंतर्गत सिद्धार्थ मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह चिमूर येथे मूकनायक फाउंडेशन चिमूर व सिद्धार्थ मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह यांच्या विद्यमाने विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.

   मेळाव्याचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्रकाश मेश्राम अध्यक्ष मूकनायक फाउंडेशन चिमूर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह सचिव प्रा. गोविंद सहारे तर प्रमुख अतिथी प्रज्ञाताई राजुरवाडे बार्टी संस्था पुणे, सहसचिव वसंत अंबादे, विश्वास इंदूरकर, नवीन बडगे, प्रकाश मेश्राम अध्यक्ष मूकनायक फाउंडेशन चिमूर, प्रा.डॉ.नरेंद्र मेश्राम, वस्तीगृहाचे अध्यक्ष संतोष भैसारे उपस्थित होते.

       बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.पुढे प्रकाश मेश्राम यांनी घाव सोसल्याशिवाय विद्यार्थी घडणार नाही, तर आपला परिवार आपल्याकडून मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. “कदम ऐसा चलो की निशान बन जाये, काम ऐसा करो की पहचान बन जाये , जिंदगी तो जी लेते है सभी मेरे दोस्तो, मगर जिंदगी जिओ तो ऐसि सबके लिये मिसाल बन जाये”.आपले विचार व्यक्त केले. 

                 प्रज्ञाताई राजुरवाडे बार्टी समता दूत पुणे यांनी विद्यार्थी हा समाजाचा आणि देशाचा कणा आहे, परिस्थितीवर मात करण्याची क्षमता जिद्द आणि चिकाटी ती तुमच्यात आहे हे विचार व्यक्त केले. वस्तीगृहाला मूकनायक फाउंडेशन चिमूर च्या वतीने भारतीय संविधान ग्रंथ व संविधान उद्देशिका भेट देण्यात आले.

मार्गदर्शन मेळाव्याला सर्व विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आम्रपाली अंबादे अधिक्षीका सिद्धार्थ मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह चिमूर यांनी मांनले.