Home महाराष्ट्र मनुदेवी व उनपदेव येथे महात्मा फुले हायस्कूलची शैक्षणिक सहल !…

मनुदेवी व उनपदेव येथे महात्मा फुले हायस्कूलची शैक्षणिक सहल !…

206

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.29डिसेंबर):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची हिवाळी शैक्षणिक सहल श्री क्षेत्र मनुदेवी व उनपदेव येथे काढण्यात आली. चोपडा व यावल तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक क्षेत्र म्हणून या दोन्ही स्थळाकडे पाहिले जाते. खान्देशातील अनेक मानता मनुदेवी या ठिकाणी होत असतात ते श्रद्धेचे स्थान आहे आणि उनपदेव येथे गरम पाण्याचा झरा आहे व एक ऐतिहासिक स्थळ आहे या दोन्ही स्थळांची सविस्तर अशी माहिती सहल प्रमुख एच डी माळी यांनी विद्यार्थ्यांना दिली. मुलांनी या दोन्ही स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद व्यक्त करून माहिती जाणून घेतली. उनपदेव येथे यात्रा भरली होती. मुलांनी यात्रेचा देखील आनंद घेतला.

        शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांच्या मार्गदर्शनाने सहल काढण्यात आली. याप्रसंगी सहल प्रमुख एच डी माळी, एस एन कोळी, एम के कापडणे, जी पी महाजन उपस्थित होते. शाळेतील शिक्षक बंधु -भगिनी व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा व सहलीचा आनंद घेतला.