

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.30डिसेंबर):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी दि. 29 डिसेंबर 2025 रोजी *महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान* अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांच्या रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीस व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शासकीय रुग्णालयातील तंत्रज्ञ चंद्रशेखर साळुंखे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी वैभव कांगणे, युवतीसभा प्रमुख व सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रिती रावतोळे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रिती रावतोळे यांनी केले. यावेळी त्यांनी आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान कार्यक्रमांद्वारे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाते म्हणून आज रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे, त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थिनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. के. एन.सोनवणे यांनी प्रथमतः महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान या कार्यक्रमाचे संयोजकत्व महाविद्यालयास दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी आरोग्य तपासणीमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होईल व लोहाची कमतरता किंवा इतर आरोग्य समस्या समजतील तसेच त्यावर तत्काळ उपचार घेता येतील, ज्यामुळे भविष्यामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या टाळता येतील. विद्यार्थिनीच्या मानसिक व आहारविषयक आरोग्यासाठी असे कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहेत असे विवेचन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सौ. सुनिता बी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार, डॉ. सी. आर देवरे, धनंजय चौधरी, जितेंद्र कोळी, निलेश भाट, विशाल पाटील यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सौ. अनिता लांडगे, सौ. शिरीन सय्यद, सौ.राजश्री निकम, श्रीमती विशाखा देसले, सौ. अश्विनी सूर्यवंशी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते.







