Home चंद्रपूर 25 ऑक्टोबर रोजी कठीणोद्धार चिवरदान पुण्य महोत्सव 

25 ऑक्टोबर रोजी कठीणोद्धार चिवरदान पुण्य महोत्सव 

198

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179

चंद्रपूर(दि.23ऑक्टोबर):-कठीण चिवरदान उत्सव समितीच्या वतीने भदन्त चंद्रमणी नॅशनल पार्क, अष्टभूजा वार्ड, रमाबाई आंबेडकर नगर चंद्रपूर येथे 25 ऑक्टोबर रोजी कठीणोद्धार चिवरदान पुण्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

    25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता चिवरदान रॅली, सायंकाळी 6वाजेपासुन रात्रौ 9 वाजेपर्यंत प्रबोधन कार्यक्रम व दरम्यान भोजनदान होईल. रात्रौ 11वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत महपरित्राण पाठ आयोजित करण्यात आला आहे. या मंगलमय कार्यक्रमात श्रद्धावान उपासकानी उपस्थित राहून तन-मन-धनाचे सहकार्य करण्यात यावे तसेच या बाबत सविस्तर माहिती करिता 8767815449 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.