

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा):-माणदेशाचा जलदाता कविवर्य माजी आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी वडजल येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती अभय धोंडीराम वाघमारे यांनी दिली
माणदेशाचा जलदाता माजी आमदार कविवर्य धोंडीराम वाघमारे( दादा) यांच्या 11 स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता वडजल ता. माण येथील धोंडीराम वाघमारे समाधी स्थळ येथे “गालावरील हास्य आणि डोळ्यातील धारा”.. कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या कवी संमेलना साठी राज्यातील मान्यवर कवी विजय चोरमारे (कोल्हापूर) नितीन चंदनशिवे (दंगलकार) सुरेश शिंदे (मंगळवेढा) प्रकाश होळकर (लासलगाव) प्रशांत मोरे (नवी मुंबई) भरत दौंडकर (पुणे) नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर) तुकाराम धांडे (इगतपुरी) खलील शेख (करमाळा) इंद्रजीत घुले (मंगळवेढा) हे उपस्थित राहून कविता सादर करणार आहेत
तरी माणदेशवासियांनी कविवर्य धोंडीराम वाघमारे दादांना आदरांजली वाहण्यासाठी या कवी संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन अभय वाघमारे यांनी केले आहे







