Home Breaking News रासेयो वतीने सिकलसेल रक्त चाचणी व वृक्षसंवर्धन अशा विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन

रासेयो वतीने सिकलसेल रक्त चाचणी व वृक्षसंवर्धन अशा विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन

82

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.23जानेवारी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिर शामराव शिवराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी ता. चोपडा येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना वतीने चहार्डी गावातील विद्यार्थ्यासाठी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसाठी सिकलसेल रक्त चाचणी तपासणी अभियान आयोजित करण्यात आले. या  अभियानात 100 पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी सहभागी होऊन आपली सिकलसेल रक्ताची चाचणी करून घेतली. तसेच शामराव शिवराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 30 पेक्षा अधिक विद्यार्थ्यानी या अभियानात सामील होऊन आपल्या सिकलसेल रक्ताची चाचणी केली .सदर अभियानासाठी चहार्डी येथील ग्रामीण रुग्णालयाचे विशेष सहकार्य मिळाले.

   या अभियानाला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कुणाल गायकवाड यांनी स्वयंसेवकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. तसेच चहार्डी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. महेंद्र पाटील यांनी स्वयंसेवकांना सिकलसेल आजाराबद्दल माहिती दिली व या आजाराचे लक्षण तसेच आजारांवरील उपाय या संदर्भात जनजागृती पर मनोगत व्यक्त केले.  अजिज खान यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची ही सिकलसेल चाचणी करून घेतली. या अभियानात महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ.आरती पाटील व मोहिनी पाटील यांनी सहभाग घेतला.

     दि. 20 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान चहार्डी येथील भाऊसो शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील परिसरात सुशोभीकरण व परिसरातील झाडांना रंगरंगोटी करून झाडांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी डॉ. कुणाल गायगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाचे योगदान दिले. झाडांना कीटक व बुरशीपासून संरक्षण मिळावे,सूर्याच्या तीव्र किरणांपासून झाडांच्या खोडाचे बचाव होऊन ज्यामुळे झाडाचे खोड मजबूत व्हावे असे विविध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्वयंसेवकांनी हे कार्य केले. स्वयंसेवकांनी केलेल्या या कार्याचे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले.