

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.20जानेवारी):- तिवसा जि. अमरावती गावातील प्रख्यात लेखक डॉ.रवि दलाल यांनी ३०० .वर्षापासून अलिखित असलेले अवधुती भजन प्रथम 1993 साली लिहून काढले. अठराव्या शतकापासून बौद्ध शाखेच्या सांगायान पंरपरेतून निर्माण झालेलं अलिखित अवधुती भजन लेखी करण्याचा मान डॉ.रवि दलाल यांनी वयाच्या 22 व्या वर्षी मिळविला .”अवधूती भजन बौद्ध धर्मातील प्रवाह ” हा डॉ.रवि दलाल यांचा अंत्यंत वादग्रस्त समीक्षासंग्रह आहे.या ग्रंथाचे एकूण चार भाग प्रकाशित झाले असून पारंपरिक पद्धतीने अवधूती भजन करणाऱ्या भक्तानी डॉ.रवि दलाल यांच्या समीक्षा ग्रंथाला . (संग्रहाला )जोरदार विरोध केला होता.अनेक ठिकाणी पुस्तके फाडण्यात आली.विदर्भातील सावंगा चिरोडी यात्रेत अवधुती भजनाचे पुस्तके जप्त करून डॉ रवि दलाल यांना पोलिसांनी निगराणी खाली ठेवले होते. या ग्रंथातील तिसऱ्या खंडातील वादग्रस्त लिखाणामुळे पोलिस स्टेशन मध्ये केस दाखल करण्यात आली होती.तीन वर्षांच्या लढाई नंतर पुस्तक विक्रीस मुभा मिळाली. डॉ.रवि दलाल यांचे अवधुती भजनाच्या ग्रंथाचे चार खंड दोन पिढ्यांनी वाचून काढले आहे.अवधुती भजन लिहून धार्मिक चौकट तोडल्याने तेव्हाचे नामांकित लेखक प्रस्तावना द्यायला तयार नव्हते. परिवर्तनवादी कवी अशोक ढोले व कवी ईबाहिम खान यांनी मात्र प्रस्तावना लिहिण्याची तयारी दर्शवली. शेवटी ईबाहिम खान यांनी ” अवधुती भजन बौद्ध धर्मातील प्रवाह ” या ग्रंथाच्या पहिल्या खंडाला प्रस्तावना लिहून दिली.प्रंचड वादग्रस्त ठरलेल्या पुस्तकाला आज तीस वर्षाचा कालावधी लोटला आहे. आतापर्यंत या ग्रंथाच्या चारही खंडाच्या हिंदी/मराठी आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून महाराष्ट्रात अनेक वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत.या ग्रंथानंतर डॉ.रवि दलाल यांनी लिखाणाची गती वाढविली.आजपर्यंत डॉ.रवि दलाल यांच्या सामाजिक वास्तवावर आधारित असलेले साहित्य म्हणजे ” अवधुती भजन बौद्ध धर्मातील प्रवाह ” हा संशोधन ग्रथं असून त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह युद्धमय, वादळरेषा, आम्ही स्वातंत्र्यात प्रवेश करतो, नामा ,बेगळ शंकरपट ,सावजीचाळ पुरणपोळी,मास्तर, एक घाव सुखाचा संथ वाहते वरदाई, पारध,कानू सोनू आणि महार पारडीचा इतिहास इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत.तर वेंलाटी , खपरेलाची पायवाट आभाळव्रण ,तीन खून, वेदनेचे वेद इत्यादी कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत .त्यांच्या चा लेखनातून वंचित,शोषित समाजाच्या वेदना आणि संघर्षाचे चित्रण प्रभावीपणे दिसते.
डॉ.रवि दलाल महाराष्ट्रातील प्रख्यात लेखक म्हणून पुढे आले.२०२५ ‘मध्ये दिल्लीमधे दंगल कथेला आंतरराष्ट्रीय राॅक्स पुरस्कार मिळाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिफ मिळाली असून मराठी साहित्य अकादमी फेलोशिफ पुरस्कार मिळाला आहे . आता पर्यंत मोठ मोठ्या पुरस्कारांनी डॉ.रवि दलाल यांना सन्मानित करण्यात आले आहे. बहुचर्चित बेगळ कांदबरीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून प्रा. छाया बोरकर Ph.D. करीत आहे आहेत. दिल्ली येथे मिळणारा राज्य शासनाचा समाजरत्न पुरस्कार डॉ.रवि दलाल यांनी स्पष्ट नाकारला होता.दि.१ फेब्रुवारी २०२६ ला तिसऱ्या अखिल भारतीय जिजाऊ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ.रवि दलाल यांना मिळाले आहे.
” अवधुती भजन बौद्ध धर्मातील प्रवाह “या ग्रंथावर डॉ.रवि दलाल यांना तब्बल तीस वर्षानंतर साहित्य क्षेत्रातील सेवेकरिता फरिदाबाद आर्ट युनिव्हर्सिटी हरियाणा तर्फे दि.१४ मार्च २०२६ रोजी दिल्ली येथे आचार्य (डॉक्टरेट ) पदवी बहाल केल्या जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







