Home महाराष्ट्र तिळगुळासोबतच दिले शब्द सुगंधाचे वाण

तिळगुळासोबतच दिले शब्द सुगंधाचे वाण

123

▪️शब्दगंध च्या कोपरगाव शाखेचा उपक्रम 

✒️कोपरगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोपरगाव(दि.20जानेवारी):- शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांचे प्रेरणेने जिल्ह्यात व तालुक्यातील नवोदित लेखकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन करताना अनेकविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शाखेच्या वतीने अध्यक्षा ऐश्वर्यलक्षमी संजय सातभाई यांनी 

हळदी कुंकू तिळगुळ समारंभ प्रसंगी शब्द सुगंधाची वाटणी केली.

     शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य कोपरगाव तालुका शाखेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक स्वाती मुळे यांनी केले. अध्यक्षा सौ. ऐश्वर्यलक्षमी सातभाई यांनी उपस्थित महिलांना शाखेच्या कार्याची माहिती दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ” शब्दगंध साहित्यिक परिषद,कोपरगाव तालुका शाखेच्या वतीने नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जातो आहे,अनेक शाळा, महाविद्यालयातून साहित्यिक निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी कविता लेखन वाचन, कथा लेखन कार्यशाळा आयोजित केली जाते. तालुक्यातील नवोदित लेखकांना याचा फायदा झाला आहे. 

शब्दगंध साहित्यिक परिषदेमुळे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याने अनेकांना मानसन्मान मिळाला आहे .

या निमित्ताने महिलांचे कविता वाचन आयोजित करण्यात आले होते. आबासाहेब पटवर्धन विद्यालयातील 

रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील शिक्षिका, चंद्रमा कलर फोटोच्या जेष्ठ संचालिका सौ. मंगल हेमचंद्र भवर , सौ. सारिका भावसार, सौ. कुलकर्णी आदी महिला यावेळी उपस्थित होत्या. सल्लागार सौ. वंदना चिकटे यांनी आभार मानले. शब्दगंध शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या या तिळगुळ समारंभात शब्द सुगंधाची मेजवानी मिळाल्याने साहित्यिक वातावरण निर्माण झाले.

कोपरगाव तालुक्यातील सर्व महिला सदस्या या समारंभामध्ये सहभागी झाल्या होत्या.