

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.20डिसेंबर):- निष्कळ व फोल ठरणारा फलटण नगर पालिकेचाअहवाल,शासन निर्णय नसताणा आणि कोणतेही परिपत्रक नसताना लोकशाहीर आण्णा भाऊ साठे योजना अंतर्गत निधी २०२३/२४ निधी ठराव क्र: ३२५ घेऊन निधी खाजगी व इतरत्र वापरून शासनाची फसवनूक करणाऱ्या मुख्य आधिकारी, बांधकाम अभियंता व सभा ठराव सह्या असणार्या सर्व सभासदांवर अँट्रोसिटी अंतर्गत फसवूनुकी चे गुन्हे दाखल करा अशी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करणेत आली
फलटण नगरपालिका मुख्याधिकारी यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे योजना अंतर्गत निधी सन२०२३/२४निधी शासन निर्णय नसता परिपत्रक नसताना जाणीव पूर्वक निधी इतरत्र वळवून मटण मार्केट परिसर विकास करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी जाणीव पुर्वक वापरला असुन त्याच बरोबर श्रीराम कारखाना मालकी हक्क असणार्या जागी रस्ता विकसित करण्या साठी वापरून जी जागा फलटण नगर पालिके ची असताना कारखाना मालकी हक्क दाखवनारा नोटीस बजवीत आहे या वरून सिद्ध होत आहे की शासनाची फसवूक केली असुन या बाबत भीम आर्मी संघटनेने यापूर्वी लेखी निवेदन दिले होते जिल्हा अधिकारी तसेच साहायक आयुक्त यांच्या शी वारंवार पत्र निवेदन ,अंदोलन, मोर्चे काडून, वेळ प्रसंगी आत्मदहन इशारा देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती यास अनुसरून जिल्हा अधिकारी व पालिका आयुक्त सातारा यांनी दखल घेत पुरावे सादर करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरी फलटण नगर पालिकेने याकडे दुर्लक्ष करत दिशा भूल करणारी माहिती दिली असून कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याने कारवाई साठी जिल्हा अधिकारी यांच्या दालना समोर येत्या ३०/१२/२०२५ रोजी अमरण उपोषण करणार असल्याचे भीम आर्मी संघटनेच्या वतीने सांगीतले.
यावेळी अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, विजय कांबळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते







